सोशल मीडियावर काही फायनान्स इन्फ्लुएन्सर घर गाडी न घेता इन्व्हेटमेंट करायला सांगतात. ते खरंच वेडे असतात का?
आज इंटरनेटमुळे जगातील सर्व ज्ञान अक्षरशः पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. पण प्रत्येक व्यक्ती ते ज्ञान मिळवत नाही. काही थोडेफार लोक ते करतात. एखादे अपारंपारिक ज्ञान आपल्याला कळते तेव्हा बहुतांश लोकांची पहिली रिएक्शन असते की ते सगळ्यांना सांगायचे. हे अतिशय नैसर्गिक आहे. पण त्या लोकांचा भ्रमनिरास होतो कारण पठडी बाहेरच्या गोष्टी सांगितल्या तर बहुतांश जग त्यांना वेड्यात काढते. जगाला पारंपारिक, नेहमी चालत असलेल्या वहिवाटीने जाणे आवडते.
लीडरशिप विस्डम बहुतेक वेळा पठडी बाहेरचे असते. लीडर एखादाच असतो इतर सगळे लोक फॉलोवर असतात. लीडर जेव्हा इतर सगळ्यांना लीडर बनवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे फॉलोवर त्याला वेड्यात काढतात. मग नंतर लीडरला कळते की लीडरशिप विस्डम इतरांना शहाणे करण्यासाठी नाही तर त्यांच्यावर राज्य करण्यासाठी असते किंवा आपल्या फॉलोवरला जे समजत नाही तिथून निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यात असते. हे नेहमी चालत आलेले आहे. फॉलोवरला फॉलो करणे जास्त आवडते त्यामुळे त्याच्यावर राज्य करणे सोपे असते.
मी ज्यांच्या मुळे प्रभावित होऊन गुंतवणूक सुरू केली त्यांच्याशी हा संवाद दहा वर्षांपूर्वी २०१६ मध्ये घडला होता:

मी: सर रॉयल एनफिल्ड बुलेटची किंमत 2006 ला एक लाख रुपये होती. त्यावेळी एखाद्याने बुलेट घेण्याच्या ऐवजी रॉयल इन्फिल्ड चा म्हणजेच आयशर मोटर्सचा शेअर घेतला असता तर आज त्याच्याकडे एखाद्या करोड पेक्षा जास्त पैसे असते. विशेष म्हणजे तुम्ही लाखो रुपयांचे सुद्धा आयशर मोटर शेअर्स तेंव्हाच घेतले होते.
सर: सगळ्यांनी शेअर केले तर गाडी कोणी घ्यायची? लोकांना गाडी घेऊ दे आपण शेअर घेऊ.
त्या एका वाक्यातील उत्तरात सगळे काही होते. जी व्यक्ती मला हे सांगत होती ती व्यक्ती आज 100 करोड प्लस पोर्टफोलीवर बसलेली आहे.
वारेन बफेट यांना जेव्हा गुंतवणुकीचे ज्ञान प्राप्त झाले तेव्हा ते अक्षरशः प्रत्येक खर्चा मागील गुंतवणूक संधी शोधू लागले. या वृत्तीचा त्यांनी इतका अतिरेक केला होता की एकेकाळी ते हेअर कट करताना सुद्धा विचार करायचे की या हेअरकट मधून खर्च झालेली रक्कम गुंतवली तर ती दहा वर्षांनी वीस वर्षांनी किती असेल? याला टाईम व्हॅल्यू ऑफ मनी म्हणतात, वॉरेन बफेट साठी आजचा $ ३० हेअर कट भविष्यातला तीन लाख डॉलर ला पडणार आहे. अर्थातच हा टाईम व्हॅल्यु ऑफ मनी प्रत्येकाचा वेगळा असणार आहे.

यात काही चुकीचे आहे का? असं करणारी व्यक्ती जगाला मूर्ख भासू शकते पण याचे उत्तर व्यक्तीसापेक्ष रित्या बदलते. शेवटी ही ज्याची त्याची मर्जी आहे, ज्याला खर्च करायचा तो खर्च करेल आणि ज्याला गुंतवणूक करून भविष्यातील आपले स्वातंत्र्य विकत घ्यायचे तो ते करेल. यात कोणीच मूर्ख नाही.
प्रत्येक जण थॉट लीडर बनू शकत नाही. ते थोडकेच असतात.
Discover more from Vittartha
Subscribe to get the latest posts sent to your email.