Blog Posts

  • नवी गुलामगिरी

    गुलामगिरी पुन्हा आली आहे, यावेळी गुलामांच्या बेड्या अदृश्य आहेत इतकेच! माझ्या कारच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त हा लेख. आज माझ्या कारला पाच वर्षे पूर्ण झाली. केवळ गरजेसाठी मी ही अतिशय साधी, सेकंड-हँड कार घेतली होती आणि कोणत्याही दिखाव्याला बळी न पडता मी गेली पाच वर्षे ती यशस्वीपणे वापरत आहे. हा प्रवास वरवर पाहता सोपा वाटत असला, तरी … Read more

  • थॉट लीडर

    सोशल मीडियावर काही फायनान्स इन्फ्लुएन्सर घर गाडी न घेता इन्व्हेटमेंट करायला सांगतात. ते खरंच वेडे असतात का? आज इंटरनेटमुळे जगातील सर्व ज्ञान अक्षरशः पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. पण प्रत्येक व्यक्ती ते ज्ञान मिळवत नाही. काही थोडेफार लोक ते करतात. एखादे अपारंपारिक ज्ञान आपल्याला कळते तेव्हा बहुतांश लोकांची पहिली रिएक्शन असते की ते सगळ्यांना सांगायचे. … Read more

  • द डेमन हॉन्टेड वर्ल्ड

    सध्या कार्ल सेगन यांचे ‘द डेमन हॉन्टेड वर्ल्ड’ (The Demon-Haunted World) वाचतो आहे. हे पुस्तक मानवी विचारांना नवी दिशा देणारे एक तत्त्वज्ञान आहे. या पुस्तकातील काही अत्यंत प्रभावी आणि डोळे उघडणारे विचार: १. विज्ञान म्हणजे ‘नम्रता’ अनेकांना वाटते की विज्ञान म्हणजे सर्व प्रश्नांची उत्तरे असणारा अहंकार आहे. पण सेगन म्हणतात की, विज्ञान म्हणजे आपण ‘चुकीचे … Read more

  • The Man from Earth

    The Man from Earth हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक  Science Fiction प्रकारातील चित्रपट आहे. थोड्या थोड्या काळानंतर मी तो बघतो. प्रत्येकवेळी विचारांना नवा आयाम मिळत जातो.  जॉन ओल्डमॅन नावाचा एक पस्तिशीतला एक कॉलेज प्रोफेसर अचानक त्याची नोकरी सोडतो. त्याला ज्या दिवशी शहर सोडायचे असते त्या दिवशी त्याचे काही मित्र, सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जमतात. … Read more

  • आर्थिक चुका टाळण्यासाठी कंपाऊंडिंग / चक्रवाढ दर समजून घ्या.

    “The greatest shortcoming of the human race is our inability to understand exponential growth.” — Albert Bartlett मित्र, नातेवाईक एकत्र आल्यावर एका विषयावर चर्चा हमखास होते. अमुक अमुक ठिकाणी जमिनीची, फ्लॅट ची किंमत ही होती आणि आज ती वाढून ती झाली आहे. यात सुरुवातीची किंमत आणि आताची किंमत आणि त्यामधला फरक हे आकडे केंद्रस्थानी असतात. … Read more

  • तात्पुरते मोह टाळा

    गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले?  खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच … Read more