रिटायरमेंट प्लॅनिंग ची निकड

तुम्ही भारतात राहणारे आणि तुमचे आजचे वय 40_50 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला लवकरात लवकर रिटायरमेंट प्लॅनिंग आणि फायनान्शिअल प्लॅनिंग करणे आवश्यक आहे.भारत मागच्या एक दोन दशकांपासून तरुणांचा देश होता. आता हाच तरुणांचा देश पुढच्या एक-दोन दशकांमध्ये म्हाताऱ्यांचा देश होणार आहे. भारतात मागच्या काही दशकांपासून सरासरी आयुष्यमान वाढत गेले आहे. नवीन बर्थ रेट कमी होत … Read more

कर्ज म्हणजे आपण न कमावलेल्या पैशांना खर्च करण्याची मुभा

कर्ज म्हणजे आपण न कमावलेल्या पैशांना खर्च करण्याची मुभा. कर्ज काढणे म्हणजे आपल्यासमोर असलेले पर्याय कमी करून टाकणे.कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्ती समोर मर्यादित पर्याय असतात. आणि या मर्यादित पर्यायांमुळे त्याच्या ग्रोथला सुद्धा मर्यादा येतात.कर्ज हे सुद्धा एक फायनान्शियल प्रॉडक्ट आहे. ते विकणाऱ्या कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट अधिक अधिक विकण्यात रस असतो. याचा अर्थ असा होत नाही … Read more

नवी गुलामगिरी

गुलामगिरी पुन्हा आली आहे, यावेळी गुलामांच्या बेड्या अदृश्य आहेत इतकेच! माझ्या कारच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त हा लेख. आज माझ्या कारला पाच वर्षे पूर्ण झाली. केवळ गरजेसाठी मी ही अतिशय साधी, सेकंड-हँड कार घेतली होती आणि कोणत्याही दिखाव्याला बळी न पडता मी गेली पाच वर्षे ती यशस्वीपणे वापरत आहे. हा प्रवास वरवर पाहता सोपा वाटत असला, तरी … Read more

थॉट लीडर

सोशल मीडियावर काही फायनान्स इन्फ्लुएन्सर घर गाडी न घेता इन्व्हेटमेंट करायला सांगतात. ते खरंच वेडे असतात का? आज इंटरनेटमुळे जगातील सर्व ज्ञान अक्षरशः पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहे. पण प्रत्येक व्यक्ती ते ज्ञान मिळवत नाही. काही थोडेफार लोक ते करतात. एखादे अपारंपारिक ज्ञान आपल्याला कळते तेव्हा बहुतांश लोकांची पहिली रिएक्शन असते की ते सगळ्यांना सांगायचे. … Read more

The Man from Earth

The Man from Earth हा माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक  Science Fiction प्रकारातील चित्रपट आहे. थोड्या थोड्या काळानंतर मी तो बघतो. प्रत्येकवेळी विचारांना नवा आयाम मिळत जातो.  जॉन ओल्डमॅन नावाचा एक पस्तिशीतला एक कॉलेज प्रोफेसर अचानक त्याची नोकरी सोडतो. त्याला ज्या दिवशी शहर सोडायचे असते त्या दिवशी त्याचे काही मित्र, सहकारी त्याला भेटण्यासाठी त्याच्या घरी जमतात. … Read more

आर्थिक चुका टाळण्यासाठी कंपाऊंडिंग / चक्रवाढ दर समजून घ्या.

“The greatest shortcoming of the human race is our inability to understand exponential growth.” — Albert Bartlett मित्र, नातेवाईक एकत्र आल्यावर एका विषयावर चर्चा हमखास होते. अमुक अमुक ठिकाणी जमिनीची, फ्लॅट ची किंमत ही होती आणि आज ती वाढून ती झाली आहे. यात सुरुवातीची किंमत आणि आताची किंमत आणि त्यामधला फरक हे आकडे केंद्रस्थानी असतात. … Read more

तात्पुरते मोह टाळा

गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले?  खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच … Read more

वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत … Read more

Results or Hardwork?

मागे एकदा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो. ते अमेरिकेत शिकले होते आणि शिक्षण चालू असताना कमाई म्हणून ते कीमेकर (नकली चावी बनवणारा) चे काम करायचे. त्यांनी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.बऱ्याच वेळा लोक चावी विसरल्यामुळे आपल्या घराच्या बाहेर अडकायचे. असे घडल्यावर बरेच लोक तणावात जातात. मग जेव्हा कीमेकर ला पाचारण केल्यावर तो अवतरतो तेव्हा देवदूत अवतरल्यासारखे … Read more

शाश्वत-कालातीत

अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा … Read more