कर्ज म्हणजे आपण न कमावलेल्या पैशांना खर्च करण्याची मुभा

कर्ज म्हणजे आपण न कमावलेल्या पैशांना खर्च करण्याची मुभा. कर्ज काढणे म्हणजे आपल्यासमोर असलेले पर्याय कमी करून टाकणे.
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या व्यक्ती समोर मर्यादित पर्याय असतात. आणि या मर्यादित पर्यायांमुळे त्याच्या ग्रोथला सुद्धा मर्यादा येतात.
कर्ज हे सुद्धा एक फायनान्शियल प्रॉडक्ट आहे. ते विकणाऱ्या कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट अधिक अधिक विकण्यात रस असतो. याचा अर्थ असा होत नाही की आपले उत्पन्न एखाद्या कर्जासाठी लायक बनले की लगेच आपण ते कर्ज उचलले पाहिजे.

कर्ज आपल्याला मिंधे बनवते. कर्जाच्या ओझ्या खाली दबलेल्या व्यक्तीला इतरांना नाराज करून चालत नाही. त्यामुळे त्याला जगभराचे बुलशीट पचवावे लागते. आवडत नाही किंवा पटत नाही म्हणून नोकरी सोडता येत नाही. कारण कर्जाचे हफ्ते चालू आहेत. नोकरी जाण्याच्या भीतीमागे सगळ्यात मोठी भीती असते की आपले कर्ज थकले तर काय होईल? आजच्या काळात मानवाला ज्या महत्त्वाच्या चिंता आहेत, त्यात आर्थिक चिंता अग्रस्थानी असतात आणि त्यातही कर्जाचे हप्ते थकतील की काय याच्या चिंता सगळ्यात जास्त असतात.
याच्याही पुढची कॅटेगरी असते ती कर्ज काढून गुंतवणूक करणाऱ्यांची. याला लिवरेज असेही म्हणतात. आपण स्वतः न कमावलेला पैसा गुंतवायचा आणि त्यातून कर्जाच्या व्याजापेक्षा अधिक रिटर्न मिळवायचा प्रयत्न करायचा. हे लिवरेज सहज उपलब्ध करून देण्यासाठी फायनान्शिअल इन्स्टिट्यूट फार उत्सुक असतात. आणि या लिवरेज च्या नादी लागून अनेक गुंतवणूकदार बरबाद झालेले आहेत.

वारेन बफेट आणि चार्ली मंगर सगळ्या जगाला माहित आहेत. बर्कशायर हाथवे मधून या दोघांनी केलेली संपत्ती निर्मिती सगळ्या जगासाठी आदर्शवत आहे. पण त्यांचा रिक गुरीन नावाचा तिसरा पार्टनर होता. रिक हा
वारेन बफेट आणि चार्ली मंगर यांच्या इतकाच बुद्धिमान होता. पण कालांतराने रिक मागे पडला आणि वारेन बफेट आणि चार्ली मंगर हे दोघे मल्टी बिलेनियर बनले. एकदा वारेन बफेट यांना रिक गुरीन यांच्या विषयी विचारले गेले की रिक चे काय झाले? तेव्हा बफेट यांनी फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, आम्ही तिघेही प्रचंड श्रीमंत होणार आहोत हे आम्हाला ठाऊक होते. फक्त प्रॉब्लेम इतका होता की रिक गुरीन यांना जास्त घाई झाली होती. त्यामुळे त्यांनी कर्ज काढून (लीवरेज वापरुन) गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केला. आणि ते नंतर कर्जाच्या विळख्यात फसत राहिले.

कर्ज ही चॉईस असते. आपल्यासमोर असलेले पर्याय वाढवायचे की संपवायचे हे कर्जाच्या आकड्यावर ठरते.

टीप: हा लेख गुंतवणुक आणि बचत करू इच्छिणाऱ्यांसाठी लिहिलेला आहे. शेतकरी कर्ज, अटळ संकटांमुळे कर्जबाजारी झालेल्यांसाठी नाही.


Discover more from Vittartha

Subscribe to get the latest posts sent to your email.

Leave a Comment

Discover more from Vittartha

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading