Author: Amol

  • आर्थिक चुका टाळण्यासाठी कंपाऊंडिंग / चक्रवाढ दर समजून घ्या.

    “The greatest shortcoming of the human race is our inability to understand exponential growth.” — Albert Bartlett मित्र, नातेवाईक एकत्र आल्यावर एका विषयावर चर्चा हमखास होते. अमुक अमुक ठिकाणी जमिनीची, फ्लॅट ची किंमत ही होती आणि आज ती वाढून ती झाली आहे. यात सुरुवातीची किंमत आणि आताची किंमत आणि त्यामधला फरक हे आकडे केंद्रस्थानी असतात.…

  • तात्पुरते मोह टाळा

    गुंतवणुकीविषयीच्या चर्चेत बऱ्याच वेळा असा तर्क केला जातो की भविष्याची चिंता करून आज तडजोडी का कराव्यात?  मिळाले ते पैसे खर्च करून मजेत आयुष्य का जगू नये? भविष्य कोणी पाहिले?  खरंतर या  तर्काला काही ठोस उत्तर नाहीये.  ही शेवटी प्रत्येकाची वैयक्तिक चॉईस आहे. तरीही सुखी भविष्यासाठी प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी चालू वर्तमानात काही निर्णय घ्यावेच…

  • वाढत्या पगाराबरोबर तुमचे  राहणीमान अधिक खर्चिक होऊ देऊ नका

    माझी पहिली नोकरी पुणे विद्यापीठात होती. विद्यापीठाच्या मागे खडकीत एका स्वस्त हॉस्टेल मध्ये मी १००० रुपये महिना भाडे देऊन राहत असे. विद्यापीठात चालत जात असे. एक वर्ष काम केल्यावर आयटी मध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणून विद्यापीठ सोडले. जातांना माझे विद्यापीठातील बॉस डॉ. जयंत कीर्तने यांनी एक सल्ला दिला. ते म्हणाले, तुझा पगार तिथे दरवर्षी वाढत…

  • Results or Hardwork?

    मागे एकदा एका इंटरेस्टिंग व्यक्तीला भेटलो. ते अमेरिकेत शिकले होते आणि शिक्षण चालू असताना कमाई म्हणून ते कीमेकर (नकली चावी बनवणारा) चे काम करायचे. त्यांनी काही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्या.बऱ्याच वेळा लोक चावी विसरल्यामुळे आपल्या घराच्या बाहेर अडकायचे. असे घडल्यावर बरेच लोक तणावात जातात. मग जेव्हा कीमेकर ला पाचारण केल्यावर तो अवतरतो तेव्हा देवदूत अवतरल्यासारखे…

  • Lapis Lazuli and the medieval world

    Lapis Lazuli and the medieval world

    नेटफ्लिक्स वर Vikings ही वेब सिरीज बघत होतो. Vikings हे मुख्यत्वे मध्ययुगीन Scandinavia मधील Norsemen लोकांच्यावर आधारलेली ऐतिहासिक वेब सिरीज आहे. त्यात वेस्सेक्स इंग्लंड ची राणी ज्युडिथ ही वर्जिन मेरीचे चित्र काढत असते. त्या चित्रातील मेरीच्या कपड्यांचा पदर सुंदर निळ्या रंगाने रंगवत असते. तो निळा रंग बनवण्यासाठी राणी एक निळा स्फटिक रगडून त्याची भुकटी बनवते…

  • शाश्वत-कालातीत

    अमेझॉन चे जेफ बेझोस यांना विचारले होते की भविष्यात काय बदल होतील, तंत्रज्ञान कुठल्या मीडिया जात आहे, नवव्यवसायिकांनी भविष्याकडे कसे लक्ष द्यावे? त्यांनी फार सुंदर उत्तर दिले होते. ते म्हणतात, भविष्यात काय बदलेल यावर लक्ष देण्यापेक्षा काय बदलणार नाही हे लक्षात घेणे अधिक सुलभ आणि महत्त्वाचे आहे. ३० वर्षांपूर्वी जेव्हा अमेझॉन सुरू केली होती तेव्हा…

  • आर्थिक नियोजन म्हणजेच सेल्फ डिफेन्स

    मध्ययुगात किंबहुना ५०-६० वर्षांपूर्वी सुद्धा स्वसंरक्षण म्हणजेच सेल्फ डिफेन्स हे जीवनावश्यक कौशल्य होते. ते नसेल तर कुणाचेही बाराच्या भावात मरण होत असे. आज काळ बदलला आहे.जीवनावश्यक म्हणून कौशल्यांची यादी करायची झालीच तर, आर्थिक नियोजन हे कौशल्य यादीत फार वरती यायला हवे. आपल्या पैशांना वाचवायला, वाढवायला आणि त्यांचे रक्षण करायला शिकणे फार महत्त्वाचे आहे.आधी तलवार आणि…

  • Best Books On Investing.

    बऱ्याच वेळा मला गुंतवणुकीविषयीच्या पुस्तकांसाठी सल्ला विचारला जातो म्हणून मला महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही पुस्तकांविषयी इथे लिहीत आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना गुंतवणुकीला सुरुवात करायची असते. गुंतवणुकीविषयी अधिक समजून घ्यायचे असते. त्याविषयीच्या तांत्रिक, मानसिक बाजू समजून घ्यायच्या असतात. पण कुठून सुरुवात करायची ते समजत नाही. साहजिक आपण पुस्तकांकडे वळतो. तेव्हाही योग्य वळणावर योग्य पुस्तक हातात आले नाही…

  • Man in the car paradox

    जेव्हा आपण एखादी छान कार पाहतो तेव्हा आपण क्वचितच विचार करतो, “व्वा, ती गाडी चालवणारा माणूस काय मस्त आहे.” त्याऐवजी, आपण विचार करतो, “व्वा, माझ्याकडे ती कार असती तर लोकांना वाटेल की मी किती मोठा माणूस आहे.” कळत-नकळत सगळेच लोक असा विचार करतात.  इथेच मानवी विचारात एक विरोधाभास आहे: लोकांना संपत्ती हवी आहे, फक्त यासाठी…

  • महागाई तुम्हाला गरिबीकडे लोटते आहे.

    असे म्हणतात, “महागाई म्हणजे जेव्हा तुम्ही शंभर रुपयांच्या हेअरकट साठी दीडशे रुपये देतात ज्यासाठी तुम्ही पन्नासच रुपये द्यायचे जेव्हा तुमच्या डोक्यावर केस होते.” सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो हे जितके त्रिकालाबाधित सत्य आहे, तितकेच प्रत्येक वस्तूची किंमत वाढत जाणार म्हणजेच महागाई वाढणार हे सुद्धा सत्य आहे. महागाईचा विचार करून आपल्या भविष्यचे नियोजन करणे फार…